About Panchayat Samiti Chandgad

चंदगड पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. चंदगड पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Read More 

Digital Grampanchayat Project

डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही 'डिजिटल ग्राम' संकल्पना राबवली आहे.


Read More

Panchayat Samiti Schemes

पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.


Read More 

Panchayat Samiti Chandgad
Menu

ABOUT

About Panchayat Samiti Chandgad

चंदगड पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. सन 2001 च्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्य1,80,781 आहे. तालुक्यात 120 ग्रामपंचायती आहेत. पूर्वेस कर्नाटक, दक्षिणेस गोवा, पश्चिमेस आंबोली  व उत्तरेस गडहिंग्लज,आजरा अशी चंदगड तालुक्याची चतुःसीमा असून, तालुक्यातून ताम्रपर्णी, घटप्रभा, माकेडेय या प्रमुख नद्या वाहतात.
चंदगड तालुक्यातील 5 सदस्य जिल्हा परिषदेत असून चंदगड पंचायत समिती मध्ये 10 सदस्यांची निवड केली जाते. येथे सरासरी पाऊस 3750 मि. मि. इतका पाऊस पडत असून या भागातील प्रमुख पिके ही भात, ऊस, नागली, भुईमुग व काजू हि आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे अडकुर, हेरे, माणगांव, तुडये, कानुर खु. व कोवाड येथे असून चंदगड येथे ग्रामिण रुग्णालय  आहे. वैजनाथ (महिपालगड), माड्डूली (केदाळी), दत्त (श्रीपादवाडी) व भवानी (पारगड) हि प्राचीन, प्रसिध्द अशी देवालये आहेत.
चंदगड पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या पंचायत समितीने केला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे.

PS Meeting and Disscusions

संकेतस्थळावर जनतेच्या तक्रारी व सुचना आम्हास अपेक्षीत आहेत. आपल्या सुचना, अभिप्राय व मार्गदर्शन विकास प्रक्रियेतील आमचे प्रेरणास्त्रोत असतील. संकेतस्थळामधील योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत लाभ घेतला जाईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो.

धन्यवाद… पंचायत समिती,चंदगड

पंचायत समितीस मिळालेले पुरस्कार :

अ.नं. वर्ष स्पर्धेचे नाव स्पर्धेचा स्तर क्रमांक पुरस्काराची रक्कम

Panchayat Samiti Chnadgad Website