About Panchayat Samiti Chandgad

चंदगड पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. चंदगड पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Read More 

Digital Grampanchayat Project

डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही 'डिजिटल ग्राम' संकल्पना राबवली आहे.


Read More

Panchayat Samiti Schemes

पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.


Read More 

Panchayat Samiti Chandgad
Menu

About Chandgad

 

आमचं चंदगड :

चंदगड तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. राजकीयदृष्ट्या हा तालुका महाराष्ट्राचा सर्वात शेवटचा तालुका (मतदार संघ) म्हणून ओळखला जातो. या तालुक्याची पश्‍चिम आणि पूर्व अशा दोन विभागामध्ये विभागणी करता येते. पश्‍चिम भाग अतिपावसाळी, डोंगराळ, वनक्षेत्र असलेला तर पूर्वभाग  सुपीक जमीन लाभली आहे.

ऐतिहासिक वारसा :
छातिचा कोट करून इतिहासाची साक्ष देणारा आणि शिवछत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले पारगड, कलानंदीगड, महिपालगड, गंधर्वगड येथे आहे.

किल्ले पारगड :
महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर पारगड हा किल्ला वसलेला आहे,स्वराज्यातील पार टोकाचा शेवटचा किल्ला म्हणून या किल्ल्यास पारगड नाव पडले असावे.गडाच्या तिन्ही बाजूला कातळाची अभेद्य तटबंदी आहे.किल्ला आकाराने प्रचंड असून त्याचे क्षेत्रफळ अंदाजे ४० एकर आहे.

किल्ले गंधर्वगड :

गंधर्वगड हे नाव काहीसे काव्यात्मक असले तरी गंधर्वगड हा एक किल्ला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदगड तालुक्यात हा किल्ला असून चंदगडापासून १२ ते १३ कि.मी. अंतरावरील एका पठारावर आहे. किल्ल्यामध्येच गंधर्वगड नावाचे गाव आहे.

किल्ले कलानंदीगड :

लहानशा आकाराचा व सोपी चढण असल्याने सहज पाहता येण्यासारखा पण दुर्लक्षित असा कलानिधीगड हा डोंगरी किल्ला वसला आहे. विशेष उल्लेखनिय गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व, पु.ल.देशपांडे यांचे मूळ आडनाव कलानिधीगडकर असे होते. त्यांचे पूर्वज या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांचे मूळ गावही चंदगड तालुक्यातील जंगमहट्‌टी हे होते.

किल्ले महिपालगड : 

प्राचीन काळात महिपाल नावाच्या राजाने हा किल्ला बांधला असे स्थानिक लोक सांगतात. सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. महिपाल गडाखालील वैजनाथ देवालय पाहता, हा गड प्राचिन आहे याची साक्ष पटते. तसेच ब्रिटीश काळात गडावरील लोकांचा लढाऊ बाणा लक्षात घेऊन, त्यांच्यासाठी लष्करात राखीव जागा ठेवल्या जात, हे लक्षात घेता या गडाचे लष्करी महत्व मोठे होते यात शंका नाही.

सांस्कृतिक वारसा :

 

 

ऐसेपरी सांगोनी !! श्रीगुरु निघाले तेथोनी !!
जेथे असे आरोग्यभवानी !! वैजनाथ महाक्षेत्र !! (अध्याय १४)

आज पर्यंत हे ठिकाण म्हणजे परळी वैजनाथ असावे असेच वाटत होते. परंतु नरसिंह सरस्वतींचे जीवन कार्य व वास्तव्य असणाऱ्या ठिकाणांशी स्थान समिपता, प्राचिनता तसेच उल्लेखित आरोग्यभवानी देवीचे मंदिर ( परिसर दुर्मिळ वनौषधिंसाठी देखिल प्रसिद्ध आहे )आणि तेथील दत्त पादुकांचे स्थान इ. पाहता मात्र हे वर उल्लेख केलेले ठिकाणच असावे असे वाटते.

वैजनाथ आरोग्यभवानी मंदिर कोल्हापूर – बेळगाव सिमेवरच् कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत आहे. महाराष्ट्रात फारसे प्रसिद्ध नसणारे हे मंदिर कर्नाटकात मात्र अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिर महिपालगड किल्ल्याच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशित वसलेले असून परिसर रमनिय व शांत आहे. आरोग्य आणि स्वास्थ विषयक नवसाला पावणारा देव अशी देवाची येथे ख्याती आहे.

 

पाहण्यासारखं :

महाराष्ट्र-कर्नाटक व गोवा राज्याच्या सीमेवर वसलेला चंदगड तालुका म्हणजे जणू पृथ्वीवर स्वर्गच अवतरलेला भास होतो.

  • तिलारीनगरनजीक असलेला स्वप्नवेल पॉर्इंट म्हणजेच गरिबांचे प्रती महाबळेश्वर आहे.
  • निसर्गवेड्या पर्यटकांना पारगड,
  • स्वप्नवेल पॉर्इंट,
  • रातोबा पॉर्इंट,
  • ग्रीन व्हॅली रिसॉर्ट,
  • सर्च पॉर्इंट,
  • मोर्लेचा दुर्गोबा धबधबा आणि तिलारीचा तुडुंब भरलेला जलविद्युत प्रकल्प पर्यटकांना भुरळ घालतोय.

त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा वेगळाच आनंद चंदगड तालुक्यात पर्यटक लुटत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *